-->

Ads

अजित पवारांनी बोलावली आमदारांची बैठक; राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली, भुजबळही पोहोचले

 

राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे.




    मुंबई, 19 एप्रिल :  गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली. मात्र आज  राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत.

    दिग्गज नेत्यांची उपस्थिती


    अजित पवार यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरीवर पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते उपस्थित आहेत. अजित पवार यांनी बैठक बोलावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.


    गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अचानक आपला सासवड दौरा रद्द केला होता. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चेला आणखीनच उधाण आलं. अजित पवार यांच्याकडे 40 आमदारांचं समर्थन पत्र असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी स्व:ता पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीतच राहाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.


    नेमकं काय म्हटलं अजित पवार यांनी?

    अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. काही बातम्या या मुद्दाम पेरल्या जात आहेत. मी कायम राष्ट्रवादीसोबतच राहील असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली. मात्र आज बैठक बोलावण्यात आली आहे.

    Post a Comment

    0 Comments