-->

Ads

काँग्रेसचा बडा नेता महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटला? सामंतांच्या गौप्यस्फोटानं खळबळ

 

सध्या राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.


    सिंधुदुर्ग, 27 एप्रिल :  सध्या राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवलं जाणार का? याबाबत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. अशा अनेक चर्चा आहेत, मात्र ठाकरे गटाचे उरलेले तेरा आमदारही आमच्या संपर्कात असून, काँग्रेसच्या बड्या नेत्याने महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

    नेमकं काय म्हटलं सामंत यांनी? 


    राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरू आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा अनेक चर्चा आहेत, ठाकरे गटाकडे उरलेले तेरा आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे वीस आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, तर काँग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर येथे भेट घेतल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.


    दरम्यान राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री बदलल्यास नवा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील याचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळू शकतं अशीही चर्चा आहे. मात्र राज्यात मविआचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्या भूमिकेकडं लागलं आहे.

    Post a Comment

    0 Comments