-->

Ads

वहिनी अंघोळ करताना बाथरूममध्ये शिरला, अन् मग.. बीडमधल्या दिराचं खळबळजनक कृत्य

 

तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे.






    बीड, 22 एप्रिल : तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे ही पीडित महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा दिर बाथरूममध्ये शिरला आणि त्याने अश्लिल चाळेही केले. बीडच्या धारूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

    पीडित महिला एका गावाती शेतात पीडित विधवा महिला तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत राहते. महिला अंघोळीला गेली असता तिचा सख्का दीर बाथरूममध्ये घुसला आणि तिच्यासोबत जबरदस्ती अश्लिल चाळे करू लागला. तू मला खूप आवडतेस म्हणत त्याने वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार देताच दिराने तिला धमकीही दिली. दिराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पीडित महिलेने आरडाओरडा सुरू केला, यामुळे शेजारील लोक जमा झाले आणि दिराने तिथून पळ काढला.

    पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Post a Comment

    0 Comments