-->

Ads

स्मशानभूमीत दफन केलेल्या महिलेवर मध्यरात्री तांत्रिक विधी, अन् पूर्ण गावात घडलं…

 

स्मशानभूमीत तांत्रिक विधी केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात येताच मांत्रिकासह सोबत विधी करणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवले आहे.







    राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील गड तकनेट गावात अंधश्रद्धेचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीत तांत्रिक विधी केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात येताच मांत्रिकासह सोबत विधी करणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून 5 जणांना ताब्यात घेतले.

    मिळालेल्या माहितीनुसार, गड ताकनेट गावात दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी महिलेवर अंत्यसंस्कारही केले होते. यावेळी अचानक काल (दि.19) स्मशानभूमीत वाहनांची लाईट दिसू लागली.


    नेमकं काय सुरू आहे याबाबत माहिती घेण्यासाठी काही ग्रामस्थ पाहण्यासाठी गेले यावेळी तिथे काही वेगळ सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले आणि त्यांनी तांत्रिक विधी करणाऱ्या लोकांना घेराव घालून बेदम मारहाण केली.

    याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आणि पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तांत्रिक विधीमध्ये वापरले जाणारे साहित्य आणि वाहने जप्त केली आहे. शंकर लाल, रुदा फकीर, बाबू लाल,  यांच्यासह आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. 


    पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तांत्रिकांपैकी शंकर हा सरकारी शाळेत शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

    Post a Comment

    0 Comments