-->

Ads

परफेक्टली वेल, अजितदादांना भेटायला पोहोचलेल्या धनंजय मुंडेंचं सूचक विधान

 

धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबतही त्यांना विचारण्यात आले असता ऑल इज वेल असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.





    मुंबई, 18 एप्रिल : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे पोहोचले आहेत. धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबतही त्यांना विचारण्यात आले असता ऑल इज वेल असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

    धनंजय मुंडे यांनी यावेळी हात जोडून यावर बोलणंही टाळलं. तर पुन्हा ऑल इज वेल आहे असं विचारलं असता परफेक्टली वेल म्हणत धनंजय मुंडे विधानभवनात निघून गेले.


     धनंजय मुंडे यांनी त्यांचे फोन बंद ठेवले होते. त्यानंतर ते थेट मुंबईत अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.  नवीन सत्ता स्थापनसाठी अजित पवार,सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनजंय मुंडे चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती. इतर कोणत्याही नेत्याला यामध्ये सहभागी केले नाही.4 बड्या नेत्यांकडून नवीन सत्ता स्थापन बाबत चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.

    दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा एकदा सर्व चर्चा फेटाळून लावताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.  अजित पवार म्हणाले की, ज्या काही मीडियामध्ये चालत आहे सगळ्या अफवा आहे . मी काल अनेकदा ट्विट करून सांगितले की ते साफ खोटे आहे. कोणी सह्या केल्या मला माहित नाही. मी माझं नेहमी प्रमाणे काम करत आहे.

    Post a Comment

    0 Comments