गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नारज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आज अजित पवार यांनी आपला सासवडमधील कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
कार्यक्रम रद्द
कीकडे अजित पवार यांचे सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला पोहोचले आहेत. बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा आणि दुसरीकडे अजित पवार यांनी सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान एकीकडे अजित पवार हे भाजपवर नाराज असून, ते भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागपूरमध्ये काल झालेल्या सभेत देखील अजित पवार बोलले नाहीत, त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आलं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार नाराज नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार अजिबात नारज नाहीत, छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची जी सभा झाली त्या सभेत जयंत पाटील बोलले नाहीत मग ते नाराज होते असं म्हणायचं का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मविआच्या प्रत्येक सभेत दोनच जण बोलणार हे आधीपासूनच ठरलं होतं. यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या सर्व आफवा आहेत. ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगड मारतात. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील अजित पवार हे भाजपसोबत जातील असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे.
0 Comments