-->

Ads

मी माणूस आहे...; नॉट रिचेबलच्या चर्चांवर अजित पवार स्पष्टच बोलले

 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.




    पुणे, 08 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्क वितर्कांनाही उधाण आलं होतं. दरम्यान, आज नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी सकाळपासून त्यांच्या नियोजित दौऱ्यांना सुरुवात केली आहे. पुण्यातील खराडी इथे ते आज सकाळी एका ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. यावेळी अजित पवार यांनी ते नॉटरिचेबल असल्याचे वृत्त फेटाळून लावताना कारणही सांगितलं. पित्ताचा त्रास झाल्यानं डॉक्टरकडे गेलो होतो असं अजित पवार यांनी म्हटलं.

    अजित पवार म्हणाले की, मी माणूस आहे आणि कार्यक्रमाला निघताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. जागरण जास्त झालं, दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हे काही आजचं नाहीय, तर याआधीही असं झालं आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेतल्या आणि शांत झोपलो. आज सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात केलीय.



    शरद पवार यांच्या मुलाखतीबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, पवार साहेबांची मुलाखत पाहिली, शेवटी पवारसाहेब आमचे सर्वोच्च नेते. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही बोलू शकत नाही. तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.

    पुणे लोकसभेची निवडणूक घेण्याची गरज आहे की नाही यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानावरही अजित पवार बोलले. लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिलेत. वेगवेगळ्या अशा निवडणुका होत असतात आणि याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल. निवडणूक जाहीर करेल तेव्हा वेगवेगळे पक्ष त्यांची भूमिका सांगतील. आता निवडणूक आयोगाने काहीच घोषणा केली नाही. त्यामुळे आधीच काही बोलता येणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं.

    Post a Comment

    0 Comments