देशाच्या जडणघडण मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अतुलनिय योगदान-
- तसलीम शेख यांचे प्रतिपादन
- फुलसावंगी १३२ वी जयंती उत्साहात साजरी
- नवीन पुतळ्याचे करण्यात आले अनावरण
फुलसावंगी प्रतिनिधी-संजय जाधव
भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमधून त्यांचे हे श्रेष्ठत्व प्रमाणित होते. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये प्रादेशिक, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला एकसंध ठेवण्याचे कार्य प्रामुख्याने होत आहे.या आशयाचे विचार फुलसावगी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात येथील सामाजिक कार्यकर्ते तसलीम शेख यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती फुलसावंगी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.तर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चोकात अभिवादन पर कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी येथील जेष्ठ नागरिक जयप्रकाश जयस्वाल हे होते.येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नुतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले असून येथे आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जुन्याच ठिकाणी नवीन पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. असून विशेष बाब म्हणजे यासाठी येथील एका महिलेने पुढाकार घेतले होते.येथील लक्ष्मीबाई कोकणे या महिलेने पुतळ्या साठी तबबल एक लाख रुपये देणगी देऊन मोठा हातभार लावला व इतर खर्च लोकवर्गणीतून जमा करण्यात आले.लक्ष्मीबाई च्या पुढाकाराची प्रसंसा केली जात आहे.कार्यक्रमात या वेळी सरपंच नवाब जानी,दिनेश नाईक,डॉ इरफान कुंदन,शमशेर खान,विजय कोकणे,कयाम नवाब,विवेक पांढरे,शैलेश वानखेडे,अरुण धकाते,विजय पाटील , अजय देशपांडे, इमरान पठाण यांच्या सह मोठ्या उत्साहात महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक विक्की भिसे यांनी केले.
0 Comments