त्यांना दडपे पोहे आवडत होते. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी पोहे केले होते. ते मी घेऊन गेलो, त्यावेळी ते म्हणाले, 'अरे मला पोटात काही जात नाही, कशाला आणले'
पुणे, 29 मार्च : 'आठवड्यातून मी दोनवेळा भाजप चे नेते गिरीश बापट भेटायला जायचो. त्यांना दडपे पोहे आवडत होते. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी पोहे केले होते. ते मी घेऊन गेलो, त्यावेळी ते म्हणाले 'अरे मला पोटात काही जात नाही, कशाला आणले' ते ऐकून मला खूप दुख झालं' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले.
भाजपचे नेते गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची मैत्रीही राजकारणापलीकडची होती. आज आपला मित्र सोडून गेल्यामुळे काकडे यांना अश्रू अनावर झाले.
'1996 पासून मी आणि बापट निवडून आलो. मी काँग्रेसकडून आलो, बापट हे भाजपकडून आले. शांतीलाल सुरजवाला हे प्रथम नागरिक संघटनेकडून आले. ज्यावेळी पुलोद झालं. त्यावेळी ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यावेळी गिरीश बापट यांना मदत करतील, शांतीलाल, ढोले पाटील, यांना मतदान देणार नाही. शांतीलाल आणि ढोले पाटील यांची निवडणूक झाली. त्यावेळी त्यांना मतं मिळतील की नाही, अशी शक्यता होती. त्यावेळी हे प्रकरण शरद पवारांकडे गेलं. ते तिन्ही चांगले मित्र आहे, ते त्यांच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहतील, असं शरद पवार यांनी सुचवलं होतं. त्यानंतर निवडणुकीत हे तसंच झालं' असं म्हणत काकडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
काही दिवसांपूर्वी बालगंधर्वमध्ये झालेल्या कार्यक्रमात शरद पवार हे गंमतीने बोलले होते. पण, त्यांना माहिती होतं, मी आणि बापट हे मित्र असलो तरी आपआपल्या पक्षासोबत एकनिष्ठ आहे. राजकारणामध्ये आपआपल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहावे. पण मैत्रीच्या बाबतीत राजकीय बाण येऊ नये, हे आम्ही आज रात्री 12.30 वाजेपर्यंत पाळलं. माझी सोमवारी भेट झाली होती, नुकतेच ते डायलिसी करून आले होते. आठवड्यातून मी दोनवेळा त्यांना भेटायला जायचो. त्यांना दडपे पोहे आवडत होते. माझ्या बायकोने त्यांच्यासाठी पोहे केले होते. ते मी घेऊन गेलो, त्यावेळी ते म्हणाले अरे मला पोटात काही जात नाही, कशाला आणले. ते ऐकून मला खूप दुख झालं होतं, असं म्हणत अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले.
'गिरीश बापट हे प्रचारासाठी व्हिलचेअरवर आले होते. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव हा बापट यांची गैरहजेरी होती. बापट जर सक्रीय असते तर निवडणुकीचा निकाल काय लागला असता हे आता सांगणे कठीण आहे. बापट यांची गैरहजेरी ही यापुढे भाजपला कायम जाणवणार आहे, असंही काकडे म्हणाले.
0 Comments