ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे.
मुंबई, 1 एप्रिल : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यता आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यता आली आहे. 'लॅारेन्स के और से मॅसेज है…. सलमान और तू फिक्स… तयारी करके रखना'… असं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे.
मॅसेजमध्ये नेमकं काय म्हटलं?
संजय राऊत यांना आलेल्या या धमकीच्या मॅसेजमुळे खळबळ उडाली आहे. हा धमकीचा मॅसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. 'हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॅारेन्स के और से मॅसेज है…. सलमान और तू फिक्स….तयारी करके रखना….' असं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
धमकीने खळबळ
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवण्यात आला आहे. केवळ धमकीच देण्यात आलेली नाही तर संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. या धमकीनं खळबळ उडाली आहे
0 Comments