नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. नितीन गडकरी यांना मंगळवारी पुन्हा धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात एका तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
?
मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. दोन महिन्यांपूर्वी असाच एक कॉल त्यांच्या कार्यालयात आला होता. गडकरी यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी सकाळी नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देणाऱ्याने आपलं नाव जयेश पुजारी असल्याचं सांगितलं. पुन्हा एकदा गडकरी यांना जयेश पुजारी या नावानेच धमकी आली आहे. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
दरम्यान गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीनं एक नंबर दिला होता. या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवावी असं त्याने म्हटलं होतं. हा नंबर एका तरुणीचा आहे. ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती समोर येत आहे. आता या तरुणीला चौकशीसाठी मेंगलोर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
0 Comments