न्यायालयाने सरकारवर केलेल्या टिपणीनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई, 30 मार्च : न्यायालयाने सरकारवर केलेल्या टिपणीनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाने या आधी कधीच सरकारला नपुंसक म्हटलं नव्हतं. यातून सरकारचा कारभार कशाप्रकारे चालला आहे हे दिसून येतं. त्यामुळे सरकारला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
कोर्टाने सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यानंतर विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायालयाने यापूर्वी कधीही सरकारला नपुंसक म्हटलं नव्हतं. यातून सरकारचा कारभार काशाप्रकारने चालला आहे हे कळतं. कोर्टाच्या टिपणीनंतर सरकारने बैठक घेऊन चर्चा करावी असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले की सरकारला खरं बोललं की राग येतो. यंत्रणांनी कोणाच्याही दबावात काम करू नये.
दरम्यान यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देखील अजित पवार चांगलेच आक्रमक झाले. अजूनही काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. सरकारने सर्व कांदा विक्री केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये काल टोळक्यांकडून धूडगूस घालण्यात आला होता. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मुद्दाम दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? याचा तपास पोलिसांनी करावा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
0 Comments