-->

Ads

उद्धव ठाकरे हाजीर हो, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनाही दिल्ली कोर्टाचा समन्स

 

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. प्रत्येक सभेत




    मुंबई, 28 मार्च : शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे. अशातच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानाच्या दाव्याबाबत दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे. या याचिकेवर सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
    Ads by 

    शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. प्रत्येक सभेत आणि पत्रकार परिषदांमध्ये बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून उल्लेख केला जात आहे.

    त्यामुळे राहुल शेवाळे यांनी दिल्ली कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. ठाकरे गटाकडून वारंवार शिवसेनेच्या आमदारांचा 'गद्दार, पन्नास खोके एकदम ओके' अशी वक्तव्य वापरून बदनामी केली जात असल्याची तक्रार या याचिकेतून करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी आदित्य ठाकरेंसह आणि संजय राऊतांना समन्स बजावला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये उद्धव ठाकरेंना कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

    उद्धव ठाकरेंची पवारांच्या बैठकीकडे पाठ

    दरम्यान, सावरकरांच्या मुद्द्यावरून मविआमध्ये मतभेदाची ठिणगी पडली आहे. पवारांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे उद्धव ठाकरे पक्षानं पाठ फिरवली. याबैठकीत पवारांनीही जर भाजपविरोधात आघाडी उभी करायची असेल तर मतभेद असणारे मुद्दे बाजूला सारले पाहिजेत असं मत व्यक्त केलं. याला बैठकीत हजर असलेल्या राहुल गांधींनीही सहमती दर्शवल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं. राहुल गांधी सातत्यानं सावरकरांवर करत असलेल्या टीकेवरून उबाठा पक्षाच्या नेत्यांची महाराष्ट्रात कोंडी झाली आहे. आता बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे यापुढे राहुल गांधी सावरकरांविरोधात बोलणं बंद करणार की पुन्हा त्यांच्या माफीनाम्यावरून डिवचत राहणार हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.

    Post a Comment

    0 Comments