28 वर्षीय एअर हॉस्टेससोबत घडला. ही घटना बेंगळूरुमधील आहे. तिथे एका फ्लॅटजवळ या तरुणीचा मृतदेह आढळला.
कधीकधी या डेटिंग ऍपसंबंधी भयंकर प्रकार घडल्याचे देखील समोर आले आहे. कारण बऱ्याचदा समोरील व्यक्तीबद्दल आपण फारसं काही ओळखत नसतो, त्यामुळे त्याच्याबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल खरी माहिती मिळणे हे शक्य असतं, त्यामुळे जर समोरील व्यक्तीने कोणाला फसवण्याचा प्लान आखला तर तो प्लान तो साध्य देखील करु शकतो.
असाच प्रकार एका 28 वर्षीय एअर हॉस्टेससोबत घडला. ही घटना बेंगळूरुमधील आहे. तिथे एका फ्लॅटजवळ या तरुणीचा मृतदेह आढळला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. हा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मध्यरात्री प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ही महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी दुबईहून बंगळुरूला आली होती. तेव्हा प्रियकराच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू झाला.
अर्चना असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या आईने पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या मुलीचा प्रियकर आदेश यानेच तिच्या मुलीला (अर्चना) जिवे मारण्याच्या उद्देशाने अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले.
त्याचवेळी पोलिसांनी सांगितले की, अर्चना धीमान बाहेरच्या बाल्कनीकडे जात होती, तेव्हा ती तेथून घसरून खाली पडली असावी. खरंतर ही घटना जेव्हा घडली तेव्हा दोघेही नशेत होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरमंगला येथील रेणुका रेसिडेन्सीच्या आवारात ही घटना घडली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सेंट जॉन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
अर्चना हिमाचल प्रदेशची रहिवासी होती आणि एका नामांकित विमान कंपनीत काम करत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते, त्यानंतर ही तरुणी तिच्या बॉयफ्रेंडच्या फ्लॅटमध्ये त्याच्याशी बोलण्यासाठी गेली होती.
पोलिसांनी सांगितले की, आदेश हा केरळचा रहिवासी असून तो बेंगळुरू येथे काम करतो. अर्चना आणि आदेश गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. या प्रकरणात कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments