म्हसवड प्रतिनिधी
राज्यातील नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे सर्वगिण विकासास मोठी खिळ असल्याचे चित्र आहे त्यामुळे नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे ओबीसी आरक्षण तसेच प्रभाग रचना हा विषय न्यायालयात अडकून पडला असल्याने गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे
अशा प्रकारचे वेळ यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे नगरपालिका वार्ड परिसरातील प्रश्न नागरिक नगरसेवकांच्या माध्यमातून सोडवून घेत असतात तसेच पंचायती समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आपल्या भागातील आरोग्य रस्ते वीज पाणी शैक्षणिक सामाजिक प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवून घेतात प्रशासकीय कालावधीत अनेकांना नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्यचा संधी पासुन वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे लोकशाहीला काळिंबा फासल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे गेले दीड वर्ष प्रशासक आहे परंतु यावर गांभीर्याने कोणी बोलायला तयार नाही शासनाने न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थेची योग्य ती माहिती सादर करून त्वरित निवडणूक जाहीर करण्याची विनंती करावी अन्यथा सर्वच राजकीय पक्षांना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागेल
थ्रीडी न्यूज साठी शहाजी लोखंडे म्हसवड
0 Comments