बीडमधील संतापजनक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
सहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या वृद्धाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. विष्णू बाबुराव सादुळे, असे नराधम आरोपीचे नाव आहे. बीड जिल्ह्यात महीला मुली सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पीडिता शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेतून गावाकडे घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
पीडित चिमुकली म्हणाली..
तिने सांगितले की, 3 वाजताच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णू बाबुराव सादुळे (वय-60) हा तिथे आला. चल तुला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने त्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितल्यास मारून टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.`
0 Comments