-->

Ads

pune koyata gang : कोयता गँगचा मोठा कट उधळला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

 पुण्यात मागच्या दोन महिन्यांपासून कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे



पुणे, 02 फेब्रुवारी : पुण्यात मागच्या दोन महिन्यांपासून कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान या कोयता गँगला वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दरम्यान आज(दि.02) पुणे मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बेकायदेशीररित्या कोयते बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले आहेत. मार्केट यार्ड पोलिसात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भवणसिंग भुरसिंग भादा (वय 35), गणेशसिंग हुमनसिंग टाक (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांकडून 18 कोयते आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत.

पुण्यात दुसरी एक धक्कादायक घटना

येरवड्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लक्ष्मी नगर परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गंभीर घटनेत रिक्षा, दुचाकी ,स्कूल व्हॅन तसेच इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


दहशत पसरविण्यासाठी नशेमधील गुंडांच्या टोळक्याने हे कृत्य केल्याचे समजते. येरवडा लक्ष्मी नगर परिसरात वाहनांची तोडफोड, पेट्रोल चोरी, हत्यारे घेऊन दहशत निर्माण करणे हे प्रकार वारंवार घडत आहेत.


गंभीर घटनांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत. घटनास्थळी येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झालेले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले. एकंदरीतच गुन्हेगारांकडून दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्यामुळे येरवडा लक्ष्मी नगर परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









Post a Comment

0 Comments