-->

Ads

EXCLUSIVE : मुख्यमंत्री शिंदे होणार का शिवसेना पक्षप्रमुख? या 3 पदांचा आहे पर्याय

या आधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे “मुख्य नेते” असे पद देण्यात आले होते. त्याऐवजी..



    मुंबई, 21 फेब्रुवारी : शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षाची आज कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकमी महत्त्वाचे ठराव मांडले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड ही केली जाणार आहे.

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, शिवेसना पक्षाची पहिली कार्यकारणी ठरवण्या संदर्भातची बैठक होणार आहे. ही बैठक संध्याकाळी ७ वाजता दक्षिण मुंबईतील ताज प्रेसिडेंसी या हॅाटेलमध्ये होणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर बैठकीतून निर्णय जाहीर करण्यासाठी, शिवसेना पक्षाची पत्रकार परीषद ही होणार आहे.


    याच बैठकीत शिवसेना पक्षाची कार्यकारणीचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे. या आधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे “मुख्य नेते” असे पद देण्यात आले होते. त्या ऐवजी आता पक्षाला अधिकृत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तीन सर्वोच्च पदाचा विचार कार्यकारिणी करत असल्याची माहिती मिळतेय.



    १) शिवसेना पक्ष प्रमुख

    २) शिवेसना अध्यक्ष

    ३) शिवेसना मुख्य नेता

    या पैकी एक पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्या संदर्भात, कार्यकारणी बैठकीत महत्वाचा निर्णय होणार आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा “मुख्य नेते” पदावर सर्वानुमते निवड करण्यात येणार आहे.

    शिवसेनेचे संसदीय नेते म्हणून जेष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचीही माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

    त्या सोबतच शिवसेना पक्षाचे नेते, उपनेते, सचिव, सरचिटणीस, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, विधान सभा संघटक, लोकसभा संघटक, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, गट प्रमुख अशा पक्षातील विविध पदांवर निर्णय जाहीर होणार आहेत. तसंच पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि इतर प्रवक्ते यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे.








      Post a Comment

      0 Comments