कल्याण पूर्व भागातील सिद्धार्थ नगर येथील रेल्वे बॅरेकमध्ये ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागातील सिद्धार्थ नगर येथील रेल्वे बॅरेकमध्ये ही घटना घडली आहे. बसवराज गरग असं पोलीस सब इन्स्पेक्टरचे नाव आहे. पंकज यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
बसवराज गरग यांनी आरोपी पंकज यादवची एका प्रकरणामध्ये चौकशी केली होती. त्यामुळे आपली चौकशी का केली याचा राग मनात धरून आरोपी पंकज यादवने रेल्वे बॅरेकमध्ये मंगळवारी रात्री बसवराज गरज यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्यामुळे गरग यांचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोप पंकज पसार झाला होता. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांच्या टीमने तपास सुरू केला. आरोपी पंकज यादव याला पेण येथून कोलशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका प्रकरणात पंकज यादव याची गरग यांनी चौकशी केली होती. या प्रकरणात कारवाई झाल्याचा राग मनात धरून गरग यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
0 Comments