प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर
पुसद फुलसिंग नाईक ● महाविद्यालय , पुसदचे क्रीडा संकुलात अपर आयुक्त , आदिवासी विकास , अमरावती अंतर्गत शासकीय व आश्रमशाळेतील अनुदानित विद्याथ्र्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन् २०२२-२३ नुकत्याच संपन्न झाल्या . या स्पर्धामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , पुसदचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंगसाजी आश्रमशाळा , माणिकडोहचे विद्यार्थी जतीन भास्कर मुकाडे यानं १ ९ वयोगटात १०० मीटर रनींग स्पर्धेत प्रथम स्थानावर येत सुवर्ण पदक पटकावले तर ऋतिक नामदेव बोंबले याने ४०० मिटर , अजाबराव दशरथ.
वाळके याने ५००० मिटर रनिंग स्पर्धेत दुसऱ्या स्थानवर येत रौप्य पदक पटकावले . या विद्यार्थ्यांनी ४ बाय १०० रिले स्पर्धेतसुद्धा सुवर्ण पदक मिळविले . महेश विष्णु आसोले , संतोष विष्णु कोते व श्रीनाथ सुदाम आढाव या विद्यार्थ्यांनी ४ बाय ४०० या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला . १७ वर्षे वयोगटात आकाश संतोष वाळके , परमेश्वर प्रदिप आमटे , गणेश किसन वाळके , शिवशंकर पांडुरंग तायवाडे या विद्यार्थ्यांनी ४ बाय ४०० रनिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला . हे स्पर्धक तीन दिवसीय विशेष क्रीडाशिबीरानंतर दि . १० ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान नाशिक येथे होत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत . राज्यपातळीवर निवड झालेल्या या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तडसे , प्रकल्प + अधिकारी आत्माराम धाबे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेश अहीर , कु . दक्षा बोराळकर , केशव शेगोकार , अरुण चव्हाण , शिक्षण विस्तार अधिकारी लोणीकर , मेटांगे , कार्यालय अधिक्षक संदीप राऊत , प्राचार्य अनिल मंदाडे , मुख्याध्यापक सुभाष ढगे यांनी कौतुक केले . या विद्यार्थ्यांनी प्रा . राजीव चौधरी , प्रा . सुनिल डाखरे , शिक्षक मनोज येरावार मार्गदर्शनात हे यश प्राप्त केले यांचे आहे .
0 Comments