-->

Ads

गर्लफ्रेंड बनून प्रेमाचा खेळ, नंतर मैत्रिणी करतात ब्लॅकमेल; 'बदनाम' टोळीचे रहस्य उघड

लग्नाची तयारी सुरू असतानाच कुटुंबात एक धक्कादायक घडल्याने खळबळ उडाली आहे.



लखनऊ, 5 फेब्रुवारी : एका कुटुंबात मुलाच्या लग्नाची स्वप्ने होती आणि प्रत्येकजण आनंदात होता. मात्र, ही सर्व स्वप्ने पूर्ण होण्याआधीच सर्व काही क्षणात संपले. कारण, परिवार ज्या मुलाच्या लग्नाची स्वप्ने पाहिली जात होती, त्याने साखरपुड्यानंतर एका आठवड्याच्या आतच टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याचे कारण म्हणजे, त्याची प्रेयसी आणि तिच्या काही मैत्रिणी आणि त्यांची टोळी. ही टोळी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून तिच्याकडून मोठी रक्कम उकळत होती. त्यामुळ त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. मृताने सुसाइड नोट सोडली नसती तर कदाचित ही 'बदनाम टोळी' उघडकीस आली नसती.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊमधील मोहनलालगंज येथील आहे. बिजनौरच्या शिव गुलाम खेडा येथील रहिवासी दिलीप कुमार यांचा पाच दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. यानंतर 20 फेब्रुवारीला हे कुटुंब लग्नाची तयारी करत होते. मात्र, त्याआधीच दिलीपने कालव्याजवळील आंब्याच्या बागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याकडून पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये ब्लॅकमेल आणि खोट्या केसेसच्या गोष्टी लिहिल्या आहेत. तर यानंतर सोनम रावत नावाच्या मुलीवर दिलीपचा छळ केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

सुसाईड नोटमध्ये काय -


झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी मृताच्या खिशात सुसाईड नोट सापडली. यामध्ये दिलीपने त्याची प्रेयसी आणि तिचे तीन मित्र आपल्याला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्याची धमकी देत ​​असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच ब्लॅकमेलच्या या खेळात तिचे तीन पुरुष मित्रही सामील होते.

हे सर्वजण गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्याकडून पैसे उकळत आहेत. या सर्वांनी मिळून एक टोळी तयार केली असून अशाच प्रकारे त्यांनी अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. मी खूप अस्वस्थ आहे आणि मला आत्महत्या करायला भाग पाडले आहे.

लग्नाची तयारी सुरू असतानाच कुटुंबात ही धक्कादायक घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. दिलीपच्या कुटुंबात वडिलांशिवाय आई आणि एक भाऊ आणि बहीण आहे. रडूत रडूत सगळ्यांचीच वाईट अवस्था झाली आहे. दरम्यान, वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसही कारवाई करत आहेत. त्यांनी सोनम, तिच्या मैत्रिणी आणि पुरुष साथीदारांविरुद्ध ब्लॅकमेल आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments