प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर
पुसद न.प. अंतर्गत नवा प्रभाग क्र . १५ ( जुना १४ ) मधील जाधव ले आउट समोर गिरीराज पार्क मधील सुमारे ३०००० स्के . फूट चा ओपन स्पेस मराठा समाज योगा भवनासाठी देण्यात आला होता . सदर जागेवर योगा भवन बांधकामासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी रु चा निधी मंजूर झाल्याची माहिती पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली . शरद मैंद यांनी मराठा समाज बांधवांतर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा . भावना गवळी यांचे विशेष आभार मानले . ही जागा उपलब्ध व्हावी म्हणून जेष्ठ नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक तसेच आ . अॅड . इंद्रनिल नाईकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मैंद यांनी यावेळी आवर्जून सांगितले . पुसद नप चे मुख्यधिकारी डॉ किरण सुकलवाड , अभियंता गिरीश डबेवार यांनीही खाली जागा शोधून देण्यात सहकार्य केले . या योगा भवनासाठी मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ . अॅड . इंद्रनिल नाईक यांच्या प्रयत्नाने १ कोटी रु . चा निधी उपलब्ध झाला होता . मात्र त्या नंतरच्या काळातील राजकीय घडामोडीने म . वि . आ . काळातील कामांना स्थगिती मिळाली . दरम्यान खा . भावना गवळी यांना शरद मैंद यांनी मराठा समाज योगा भवन साठी २ कोटी रु . चा निधी उपलब्ध व्हावा असे विनंती पत्र दिले होते . त्याचपत्राची दखल घेत खा . भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे शिफारस व पाठपुरावा केला . नुकतेच २ कोटी रु चा निधी पुसद च्या मराठा योगा भवनासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन मंजूर झाल्याचे आदेश नगर विकास विभागाने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी काढले आहेत .
0 Comments