जिल्हा प्रतिनिधी :- संजय जाधव
25 /02 /2023 -- (पुसद)
गोरसिकवाडी भारत च्या वतीने आज पुसद येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठान मध्ये बंजारा समाजाचे दैवत जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंती या निमित्ताने समाजातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले अशा पालकांचा काही आदर्श शेतकऱ्यांचा , व समाज प्रबोधनकारांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ अनिता मनोहरराव नाईक माजी नगराध्यक्ष पुसद तर प्रमुख पाहुणे म्हणून संत नेहरू महाराज पोहरादेवी संत कैलास महाराज हेगडी संस्थान गरिबांचे आरोग्य दूत डॉ एम आर मेघावत शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव ज्योतीराम महाराज समाज प्रबोधनकार आदी
मान्यवर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने संत श्री जगद्गुरु सेवालाल महाराज , बालब्रह्मचारी तपस्वी संत श्री डॉ रामराव बापू शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेब यांच्या फोटोचे पूजन करून माल्य अर्पण केले त्यानंतर नुकताच पोहरादेवी येथे लाखो बंजारा समुदायाच्या उपस्थितीत संत सेवा ध्वज व संत श्री जगद्गुरु सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा ज्यांनी बनविला अर्थात रामू किसन चव्हाण यांचा सत्कार आमच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यासोबत पुसद विधानसभा मतदारसंघाचे भविष्याचे राजकीय शिलेदार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या सहचरणी पत्नी जे प्रसार माध्यमांपासून प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जोपासून उदगम फाउंडेशन माध्यमातून हजारो नेत्र व
इतर महिला रुग्णांना शिबिरे घेऊन उपचार दिला अशा या सेवावर्तधर्म जोपासणाऱ्या सौ सोनल ययाती नाईक , व डॉ रामचंद्र राठोड नेत्र तज्ञ , किशोर भाऊ राठोड काटखेडा आदर्श दूध उत्पादक शेतकरी , सौ दुर्गाबाई दशरथ राठोड आरेगाव विष मुक्त ऑरगॅनिक फार्मिंग आदर्श महिला शेतकरी अशा विविध क्षेत्रातील 13 व माझा देखील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर लढा करिता समाज बांधवांच्या वतीने यथोचित सन्मान संत श्री जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला माझा दररोज कुठे ना कुठे सत्कार होत असतो त्याचं फारसं काही वाटत नाही पण आज समाज बांधवांच्या या सन्मानाने मी भारावून गेलो अभावामध्ये जगणाऱ्या आपल्या समाजबांधवांच्या न्याय व हक्कासाठी अस्वस्थ असणाऱ्या बांधवांच्या अधिकाराच्या लढाईत समाजाच्या उत्थान व उत्कर्षाकरिता मी सदैव रस्त्यावरच्या लढाईसाठी कार्य तत्पर असेल ग्वाही दिली संत श्री सेवालाल महाराज यांच्या विचाराचा आत्मसात करून समाजाने अंधश्रद्धा व्यसन पासून दूर राहून आधुनिक विचाराचा अवलंब करावा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील समाजातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील गोरसिकवाडी भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ रामावत यांच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त सर्व बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यानिमित्ताने नेत्र रुग्णांचा शिबिर आयोजित करण्यात आले होते या समाज उपयोगी उपक्रमातून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला याचा सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्यावर सर्वांनी अभिनंदनचा वर्षाव केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राठोड यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजनाच्या अनुषंगाने विशाल पवार (कोणदरी) व इतर समाज बांधवांनी सहभाग घेतला होता
सहकार्य-,डॉ रामचंद्र राठोड वसंत नेत्रालय पुसद,धर्मगुरु डॉ संत रामराव महाराज बंजारा विकास फेडरेशन बसवकल्यानं कर्नाटक,
सत्कार मुर्ती-
1)हरपणी सोनल ताई नाईक पुसद
2) डॉ रामचंद्र राठोड सर पुसद
3) संत जयसिंग महाराज गोरक्षण संथा
4) अविनाश प्रेमसिंग राठोड दिग्रस
5) किशोर खिरुसिंग राठोड-महागाव
6) आकाश ऊत्तम राठोड-महागाव
7) दुर्गाबाई दसरथ राठोड -पुसद
8)राम सोमला राठोड - पिंपळवाडी ईसापुर
9)प्रेमदास चरणसिंग पवार-पुसद
10)अँड पंजाबराव चव्हाण -हिंगोली
11)रामू किसन चव्हाण-यवतमाळ या सत्कारमूर्तीचे या कार्यक्रमांमध्ये सत्कार करण्यात आले
0 Comments