-->

Ads

विभागीयनंतर राज्यस्तरीय स्पर्धेत ध्येय गाठाअप्पर आयुक्त सुरेश वानखेडे ; यांनी केले विभागीय स्पर्धेचे उद्घाटन

 विभागीयनंतर राज्यस्तरीय स्पर्धेत ध्येय गाठाअप्पर आयुक्त सुरेश वानखेडे ; यांनी केले विभागीय स्पर्धेचे उद्घाटन


प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

पुसद . विभागीय स्पर्धेमध्ये यश संपादन करून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे ध्येय गाठावे , अशी अपेक्षा आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पर्धकांकडून व्यक्त केली . अप्पर आयुक्त अमरावती विभाग अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील अमरावती विभागस्तरीय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्या आहे .


कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ . अरुण पाटील , फुलसिंग नाईक महाविद्यालय , पुसद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास अमरावतीचे अप्पर आयुक्त सुरेश वानखेडे होते . त्यांनी मशाल ज्योत पेटवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

बारा दिल्या . या क्रीडा स्पर्धांमध्ये अमरावती विभाग अंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील एकूण | जिल्ह्यांतील सात आदिवासी विकास प्रकल्पातील सुमारे 2,500 खेळाडू आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन असल्याची करणार माहिती प्रास्ताविकातून विभागीय स्पर्धांचे

आयोजक तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी दिली . याप्रसंगी मंचावर उपायुक्त आदिवासी विकास अमरावतीच्या कुमरे मॅडम , उपायुक्त शिक्षण संजय ससाने , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोलाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे , कळमनुरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी छंदम लोखंडे , औरंगाबाद प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे , आदिवासी सेवक श्यामराव व्यवहारे व रामकृष्ण चौधरी नारायण काळे आणि शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments