( प्रतिनिधी सुरेश सिडाम) स्व.बाबासाहेब नाईक विद्यालय पारवा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण देशमुख हे होते प्रमुख अतिथी प्रा. महादेव गावंडे,अजय डगवार ,
सुभाष जामकर, प्रा.डी वी राठोड हे होते, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते व शिक्षकांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले, संजय चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांचा परिचय आपल्या भाषणातून व्यक्त केला, प्रा महादेव गावंडे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा आढावा व अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नका सांगणारे संत सेवालाल महाराज हे होते , आपल्या अध्यक्षीय भाषणात किरण देशमुख यांनी संत सेवालाल यांचा जन्म त्यानंतर पर्यावरण वादी
व्यक्तिमत्व असणारे संत सेवालाल महाराज होते, व त्यांनी केलेले कार्य आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी व्यक्त केले, या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा सुनील डाखोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनिष जयस्वाल यांनी केले, संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी कण्यासाठी , रायसिंग चव्हाण, भारत गडदे,लक्ष्मण मेंद्रान, अनिल डवले, सुरज राठोड, राजू पांडे, नामदेव राठोड, राजू चव्हाण, विष्णू खंदारे, नितीन कोकरे आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला व वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली
0 Comments