-->

Ads

🔹मुलीच्या लग्नाच्या दिवशीच आईचा मृत्यू ▪️चौधरी परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर



यवतमाळ  प्रतिनिधीः संजय जाधव

 येथून जवळच असलेल्या शिरपुल्ली येथील मंजुषा अदिनाथ चौधरी वय ४० वर्षे यांचा मुलीच्या लग्नाच्या दिवशीच काळाने जडप घालून  दुर्दैवी मृत्यू झाला.

  मंजुषा चौधरी यांची मोठी मुलीगी पुजा हिचा विवाह सेलू येथील ठाकरे कुटुंबातील प्रेम यांच्याशी दि.१० फेब्रुवारी रोजी पुसद येथे झाला.परंतु काळाच्या मनात काहीतरी वेगळेच होते.या दोन्ही कुटुंबाच्या आनंदाच्या प्रसंगी नव वधुच्या आईची तब्बेत बिघडल्याने त्यांना पुसद येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.एकीकडे लग्नमंडपात सर्व पाहुणे मंडळी लग्नात कराव्या लागणाऱ्या विधी आटपवत असतानाच दुसरीकडे नववधुच्या आईवर दवाखान्यात उपचार सुरू होते.लग्नविधीच्या वेळी आई उपस्थित नसल्याने त्यांनी व्हिडिओ कॉलवरच लग्न विधी बघितला.त्यानंतर सर्व विधी आटोपून नवरी मुलीच्या पाठवनी नंतर नववधुच्या आईची प्राणजोत मालवली.नववधु पुजा आपल्या नवजीवनाचे स्वप्न रंगवीत असतानाच आईच्या मृत्यूची वार्ता कळल्याने तिच्या स्वप्नावर दुःखाचा डोंगर कोसळला.आनंदाच्या प्रसंगी मंजुषा चौधरी यांच्या अशा अचानक जाण्याने शिरपुल्ली गावावर शोककळा पसरली होती.या घटनेने गावात हळहळ व्यक्त केल्या जात होती.त्यांच्या पश्चात पती,सासु सासरे,दोन मुली,एक मुलगा,असा मोठा परीवार आहे.त्यांचा अंत्यविधी शिरपुल्ली येथे करण्यात आला.

Post a Comment

0 Comments