उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
मानोरा तालुक्यात समाधीस्थ झालेले पुरोगामी विचाराचे संत सेवालाल महाराज यांच्या पुण्यभूमीत येत्या १२ फेब्रुवारी रोजी शेकडो कोटी रुपयाच्या विकासात्मक कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाला देशातील विविध राज्यातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, तरी उमरखेड तालुक्यातील बंधू व भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन निंगनूर येथील ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच अंकुश राठोड यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्ष- शिवसेना युती शासन असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी १०० कोटी व आता भाजप बाळासाहेब शिवसेना या पक्षाचे सरकार राज्यात असतांना वाढीव ५९३ कोटी रुपयाचे विकास कामे तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे प्रस्तावित आहेत.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि मंत्री परिषदेतील इतर मंत्री, खासदार, आमदार, संत सेवालाल महाराज, तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या कुळातील सदस्य गण आणि असंख्य गणमान्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी १०० कोटी व आता भाजप बाळासाहेब शिवसेना या पक्षाचे सरकार राज्यात असतांना वाढीव ५९३ कोटी रुपयाचे विकास कामे तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे प्रस्तावित आहेत.
विकास आराखडा शिखर समितीने सुचविलेल्या आणि राज्य शासनाने मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन राज्याच्या शीर्ष नेतृत्वाकडून १२ फेब्रुवारी रोजी करण्यात येत आहे.
क्रांतिकारी विचारांचे संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पूर्णकृती पुतळा आणि सेवाध्वजाचे रोहन सुद्धा या दिवशी होत असल्याने मोठ्या संख्येने समाज बांधव आणि भक्त व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अंकुश राठोड यांनी केले
0 Comments