आता मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. ऑरेंज गेटवरून ग्रँटरोडला पोहोचण्यासाठी सध्या 30 ते 50 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हे अंतर कमी होऊन आता अवघ्या 6 ते 7 मिनिटांवर येणार आहे.
मुंबई, 23 फेब्रुवारी : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, आता मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट ते ग्रँट रोड स्टोशन परिसर या मार्गावर मुंबई महापालिकेकडून 5.56 किलोमीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. सध्या ऑरेंज गेट ते ग्रँटरोड स्टेशन हे अंतर पार करण्यासाठी 30 ते 50 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हा पूल झाल्यानंतर वेळेची बचत होणार असून, अवघ्या 6 ते 7 मिनिटांमध्ये ऑरेंज गेटवरून ग्रँटरोडला पोहोचणे शक्य होणार आहे.
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट ते ग्रँट रोड स्टोशन परिसर या मार्गावर मुंबई महापालिकेकडून 5.56 किलोमीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल उभारण्याच्या कामला वेग आला असून, या बाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात झाल्यापासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत 42 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
हा पूल नागरिकांच्या सेवेत आल्यानंतर वेळेची मोठी बचत होणार आहे. आज ऑरेंज गेटहून ग्रँट रोड स्टोशनला पोहोचायचे झाल्यास 30 ते 50 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हा पूल निर्माण झाल्यानंतर हाच कालावधी सहा ते सात मिनिटांवर येणार आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे. सोबतच मुंबईकरांची वाहतूककोंडीतून देखील सुटका होणार आहे.
0 Comments