-->

Ads

सुरू झाला नोटांचा पाऊस? चिंचवडमध्ये कारमध्ये 43 लाखांची रोकड आणि शस्त्र सापडली

 

एवढंच नाहीतर कारमध्ये धारदार हत्यार सापडली आहे. संबंधित कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.



    चिंचवड, 10 फेब्रुवारी : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशातच चिंचवडमध्ये आज एका कारमध्ये तब्बल 43 लाखांची रोकड सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे आणि कुणी आणली याचा तपास सुरू आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाच्या अधिकारीकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रक्कम कुठे नेली जात होती. याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून तपास सुरू आहे.

    एवढंच नाहीतर कारमध्ये धारदार हत्यार सापडली आहे. संबंधित कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

    दरम्यान, आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी आज शेवटच्या दिवशी कोण कोण आपले अर्ज माघारी घेत आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

    Post a Comment

    0 Comments