मित्तल कॉलेजतर्फे या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धक्कादायक घटना घडली.
मुंबई, 10 फेब्रुवारी : मुंबईतील मालाड परिसरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कबड्डी खेळताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कबड्डी खेळत असताना हा तरुण अचानक खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मित्तल कॉलेजतर्फे या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तीक राजला मित्तल कॉलेजकडून खेळण्यासाठी बोलावण्यात आले होते. कीर्तीक राजचा सामना आकाश कॉलेजशी सुरू होता. यावेळी किर्तीक मित्तल कॉलेजकडून खेळत असताना तो आकाश कॉलेजच्या खेळाडूंच्या कॅम्पमध्ये डेड लाइन ओलांडून त्याला स्पर्श करायला गेला तेव्हा आकाश कॉलेजच्या खेळाडूंनी त्याला पकडले. तेव्हा किर्तीक बाद झाला.
पण किर्तीक आऊट झाल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जात असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. यावेळी दोन्ही बाजूंच्या खेळाडूंनी किर्तीकला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा नाही झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तत्काळ मालाड पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत किर्तीकला शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कुटुंबीयांनी केली ही मागणी -
तर किर्तीकचा मृत्यू कसा झाला, ही माहिती बाहेर यायलाच हवी, असे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांनी एडीआर नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
0 Comments