बारावीच्या पेपरच्या टेन्शनमुळे औरंगाबाद नंतर आता पनवेलमध्येही दुर्दैवी घटना घडली आहे
मुंबई, 21 फेब्रुवारी: आजपासून बारावीचा परीक्षेला सुरुवात झाली आहे बोर्डाच्या परीक्षा म्हंटलं की टेन्शन येणं हे स्वाभाविक आहे. मात्र याच टेन्शनमुळे औरंगाबाद नंतर आता पनवेलमध्येही दुर्दैवी घटना घडली आहे. पनवेलमधील 17 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वंश म्हात्रे असं या विद्यार्थ्यांचं नाव असून तो बारावीत शिकत होता. वंशची आजपासून परीक्षा होती मात्र त्याआधीच त्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे.
प्राप्त माहितीनुसार, वंश नवनाथ म्हात्रे असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. पनवेल इथल्या देवदर्शन सोसायटीत तो राहत होता. काल रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन वंशनं स्वतःला संपवलं. "मी अभ्यासाला कंटाळून स्वतःला संपवतो आहे" अशा आशयाची सुसाईड नोटही वंशनं लिहून ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आज पासून वंशाची बारावीची परीक्षा सुरु होणार होती. मात्र अभ्यासाचा ताण आणि बारावीच्या परीक्षेचं टेन्शन यामुळेच वंशनं हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती मिळाली आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही काय पहिली घटना नाहीये. औरंगाबादमध्येही एका बारावीच्या विद्यार्थ्यांनाआत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
औरंगाबादमध्येही बारावीच्या विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य
अवघ्या काही तासांवर बारावीची परीक्षा आलेली असताना औरंगाबादमध्ये एका विद्यार्थ्यांने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील एन 8, सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आमन रविंद आहेरेवाल असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे आमन आहेरेवाल हा अभ्यास करत होता. रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत अभ्यास करण्यासाठी गेला आई तिथेच त्यानं स्वतःला संपवलं.
विद्यार्थ्यांनो खचून जाऊ नका
बारावी किंवा दहावीची बोर्डाची परीक्षा ही महत्त्वाची नक्कीच आहे. पण जर तुमचा अभ्यास झाला असेल किंवा तुम्हाला काहीच येत नसेल तरी हरकत नाही. पण अशा प्रकारचं टोकाचं पाऊल कधीच उचलू नका. दहावी किंवा बारावीची परीक्षा ही तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. त्यामुळे अपयशाचा सामना करावा लागला तरी खचून जाऊ नका. आयुष्य खूप सुंदर आहे स्वतःच्या टॅलेन्टला ओळख आणि त्यात पुढे जा पण खचून टोकाचं पाऊल उचलणं हा योग्य पर्याय नाही.
0 Comments