-->

Ads

ऐतिहासिक सेवाध्वज कार्यक्रम पोहरागड 12 फेब्रुवारी 2023 !ग्राउंड रिपोर्ट


यवतमाळ प्रतिनिधी:-  संजय जाधव

मा.संजयभाऊ राठोडची मती;आणि पोहरागड विकासाला गती!


1) 12 फेब्रुवारीला 10 लाख जनसागर उसळणार

2)  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,  मंहत अनेक मंत्री,खासदार आमदार उपस्थितीत राहणार.

3) संत सेवालाल महाराज यांचा अश्वारुढ पंचधातुचा भव्य पुतळा अनावरण,135 फुट उंच सेवाध्वज सह 593 कोटी रुपयांचा विकास कामाचे भूमिपूजन


••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पोहरागड काल पोहरागड येथे जाऊन 12 फेब्रुवारीला होणाऱ्या ऐतिहासिक  सेवाध्वज कार्यक्रमांची ग्राउंड रिपोर्ट जानुसिंग महाराज आणि प्रकाश महाराज यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटी देऊन घेण्यात आला. कार्यक्रमाची जयत तयारी बघून आमची टीम थक्क झाली.


गोरबंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरागड येथे 12 फेब्रुवारी 2023 रोजी क्रांतीसुर्य संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पंचधातूच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आणि 135 फूट उंच सेवाध्वजाची स्थापना,593 कोटी रुपयाचे विकास कामाचे भुमिपुजन  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्या उपस्थित केली जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे शानदार उदघाटनसाठी मां.संजयभाऊ राठोड आणि त्यांची टिम अहोरात्र मेहनत घेत आहे.


पोहरागड, उमरीगड दृष्टीक्षेप!  संत सेवालाल महाराज यांचा जन्म म्हैसूर प्रांतातील गुत्ती येथे 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. संत सेवालाल महाराज हे क्रांतिकारी आणि विज्ञानवादी विचाराचे पाईक होते. गोर बंजारा समाजाच नव्हे तर बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी त्यांनी आपल्या अमृतवाणी मधून गोरबंजारा समाजाला जाणंजो... छाणंजो... पचच... माणंजो! हा क्रांतिकारी संदेश दिला होता. गोरबंजारा समाजाचे फार मोठे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान म्हणून पोहरागड, उमरीगडाची सर्व दूर ख्याती आहे. जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची पावनभूमी असलेल्या पोहरागडामध्ये संत सेवालाल महाराज, संत बामणलाल महाराज, महान तपस्वी संत डॉक्टर रामरावबापू महाराज यांची समाधी असून उमरीगड येथे संत जेतालाल महाराज आणि सामकी मातेची समाधी आहे. अंधश्रद्धेच्या जोखडातून तमाम गोर बंजारा समाजाला दिशा देऊन बाहेर काढणारे संत सेवालाल महाराज  यांची ही पावनभूमी म्हणजे पोहरागड! 

पोहरागड आणि उमरीगड  हे पवित्र श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान असल्यामुळे या ठिकाणी दररोज येणाऱ्या लोकांची संख्या फार  मोठ्या प्रमाणात असून पोहरागड, उमरीगड येथे सर्वात मोठी यात्रा राम नवमीला भरवण्यात येते. त्यावेळेस संपूर्ण भारतातून जवळपास 15 ते 16 लाख भाविक भक्त यात्रेला येतात. परंतु पाहिजे त्या प्रमाणात आतापर्यंतच्या कोणत्याही शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या तीर्थक्षेत्र विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिले  नव्हते.


संत सेवालाल महाराज यांचे बोल आणि मां.संजयभाऊ राठोड


संत  सेवालाल महाराज यांनी आपल्या अमृतवाणीत म्हटले होते की,

 मार पालेर खिला मच ठोक लियु!

 ही  अमृतवाणी खरी ठरण्यासाठी  योगायोग असा की मा. संजयभाऊ राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद  मागील भाजपा शिवसेना सरकारात देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यामुळे त्यांनी सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. परंतु त्यांनी अंतर आत्म्याचा कौल लक्षात घेऊन त्यांनी नाराजीनेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले. आणि संत सेवालाल महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांनी तीन डिसेंबर  2018 रोजी पोहरागड येथे सव्वाशे कोटी निधीचे नंगारा भावनांचे भव्य उद्घाटन करून घेतले होते. त्यावेळी जवळपास सात ते आठ लाख लोकांची प्रचंड उपस्थिती लाभली होती. हे सर्व संत सेवालाल महाराज आणि संत डॉ. रामरावबापु महाराज यांच्या आर्शिवादाने पार पडले होते. पंरतु  हे सर्व काम प्रगतीपथावर असताना मा. संजयभाऊ राठोड यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. त्यामुळे पोहरागडातील नंगारा भावनांचे काम काही काळ निधी विना थांबले होते.  पुन्हा संत सेवालाल महाराज यांचे आशीर्वादाने मा. संजयभाऊ राठोड यांची मंत्री पदावर वर्णी लागली. आणि पुन्हा नंगारा भवन कामाला गती आली केवळ नंगारा भवन करूनच मा. संजयभाऊ राठोड हे थांबणार कसे संजयभाऊ तो लंबे रेस का घोडा है। त्यांनी मंत्रीपदाच्या अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये 593 कोटीचा पोहरागड, उमरीगडांचा भव्य आराखडा तयार करून शासनाकडे सादर केला. आणि शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ आराखडा मंजूर केलेला आहे. या 593 कोटी विकास कामाचे आराखड्याचे सर्व श्रेय मा. संजयभाऊ राठोड पालकमंत्री वाशिम जिल्हा यांना जाते

 या 593 कोटी रकमेत संत सेवालाल महाराज समाधी स्थळाचे व जवळील परिसराचे विकास होणार असून संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुद्धा नवीन आकर्षक आणि सुंदर रीतीने बांधकाम होणार आहे. त्यामध्येच उमरीगड येथील संत जेतालाल महाराज, सामकी याडी आणि प्रल्हाद महाराज यांच्या मंदिराचे विकास व आजूबाजूच्या परिसरातील सुशोभीकरण आणि परिसरातील रस्ते, पाणी, विज,भाविक भक्तासाठी भव्य भक्तीनिवास व इतर सर्व सुविधा होणार आहेत. 


कार्यक्रमाची पुर्वतयारी


या भव्य दिव्य सोहळ्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू असुन  कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी मां. मंत्री संजयभाऊ राठोड हे दररोज महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात सभा घेत आहे.  सध्या पोहरागड येथे लाखो लोकांना बसण्याकरिता भव्य मंडपाची निर्मिती,बैठक व्यवस्था, कार पार्किंग,  श्री .पराग  पिंगळे शिवसेना जिल्हा प्रमुख व प्रा. राजेश चव्हाण यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आजूबाजूचे रस्ते, नंगारा भावनांचे काम, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पंचधातुनी बनवलेला भव्य पुतळा, 135 फूट उंच सेवाध्वजाचे काम पूर्ण झालेले आहे. शिल्पकार रामू चव्हाण यांच्या हातून साकारलेला हा पंचधातूचा अप्रतिम पुतळा अतिशय सुंदर व भव्यदिव्य असून त्याला नेण्यासाठी युवकाच्या रूपाने पांढरे  वादळ उसळलेले होते. शुक्रवारी यवतमाळातून संत सेवालाल महाराजांचा पुतळा पोहरादेवी येथे नेण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत  3000 च्या वर बाईक सह प्रत्येकाच्या हातात शुभ्र ध्वज होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी या रॅलीला सेवाध्वज दाखविला. संत सेवालाल महाराजांच्या जयघोषाने आसमंत निनादून गेला होता. 12 फेब्रुवारीला पोहरागड  येथे संत सेवालाल महाराजांचा पंचधातूच्या पुतळ्याचे अनावरण, 135 फूट उंच सेवाध्वजाचे ध्वजारोहण, महाराष्ट्राचे  लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांच्यासह विविध खात्याचे मंत्री तसेच संत महंतांच्या आणि गोरबंजारा समाजातील आजी-माजी आमदार व खासदारांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व इतर सर्व राज्यात गोरबंजारा समाजामध्ये प्रचंड उत्साह असून जवळपास दहा लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी मा. संजयभाऊ राठोड यांच्यासह त्यांचे अनेक कार्यकर्ते विशेषत: सिने दिग्दर्शक प्रा. चंद्रकांत काळूराम पवार व इतर मंडळी महाराष्ट्राच्या सर्वच  तालुक्यात सभेचे आयोजन करत असून जास्तीत जास्त लोक एकत्र आणण्यासाठी मा. संजय भाऊ राठोड हे रात्रंदिवस  प्रयत्न करत आहेत. एक दिवस समाजासाठी अशी हाक मा. संजयभाऊ राठोड यांनी तमाम गोरबंजारा समाजाला दिलेली असून या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या वातावरण निर्मिती आणि प्रचार, प्रसारासाठी मध्य प्रदेशातून एक रथ, आंध्र प्रदेशातून एक रथ, मुंबई मधून एक रथ आणि कर्नाटकातून एक रथ असे चार रथयात्रा काढण्यात आलेली असून सदर रथयात्रा महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज , मंहत शेखर महाराज, महंत रायसिंग महाराज, मंहत यशवंत महाराज  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोहरागड येथे येत आहे.या रथयात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे. आणि दररोज व्हाँटसपच्या माध्यमातून विविध संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दन समाजेसारू अशी हाक देत आहे. त्यामुळे गोरबंजारा समाजामध्ये फार उत्साहाचे वातावरण असून या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आज तमाम तांडया  तांडयामध्ये जयत तयारी सुरू आहे. याशिवाय 


170 कोटी निधीतून साकारतोय पोहरादेवीतील संग्रहालय!

  बंजारा समाजाची काशी श्री क्षेत्र पोहरादेवीचा 170 कोटीच्या आनंदपुर साहेब "विरासत एक खालसा" च्या धरतीवर विकास करण्यात येणार असून संग्रहालयाच्या रूपाने बंजारा समाजाची संस्कृती, इतिहासाच्या पाऊल खुणा जपल्या जाणार आहेत .येथे आतापर्यंत शंभर कोटीच्या निधीतून 12 गॅलरीचे निर्मिती होत आहे. भारत देशात 14 कोटी बंजारा समाजबांधव 16 राज्यांमध्ये विखुरला आहे. बंजारा समाजाची भाषा, वैशभूषा, संस्कृती आगळीवेगळी आहे. या संस्कृतीला हजारो शतकांचा इतिहास आहे. बंजारा आणि शिख समाज समकालीन असल्याने आनंदपुर साहिबच्या धरतीवर पोहरादेवीच्या विकासाची मुहूर्तमेढ  रोवली गेली. राज्य शासनाने बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन व्हावे .या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवीचा विकास आराखडा तयार केला. एकूण 170 कोटीतून या तीर्थक्षेत्र विकास पूर्णत्वास येणार आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री मा. संजयभाऊ राठोड यांनी सुरुवातीपासूनच या निर्माण कार्याच्या सातत्याने पाठपुरावा केला. असुन लवकरच हे काम पुर्ण होणार आहे.

 महाराष्ट्राचे लँन्डमार्क

 पोहरादेवी तीर्थक्षेत्रांच्या समग्र विकासात अद्धितीय अशा वस्तू संग्रहालयामध्ये संत सेवालाल महाराज यांचा जीवनपट, बंजारा समाजाचा इतिहास संस्कृतचे दर्शन घडेल दोन वर्षांपूर्वी निधन झालेले महान तपस्वी संत डॉ. रामरावबापु महाराज यांची माहिती गॅलरीत राहणार आहे. येथे स्वतंत्र विश्रामगृह, एक हजार लोकांना सामावून घेऊ शकणारे डोम वजा सभागृह तसेच पोहरादेवी ते सिंगल मार्गाचे सात मीटर उंदरी रुंदीकरण केले जाणार आहे. ही वास्तु भविष्यात महाराष्ट्राचे "लँन्डमार्क" ठरेल असा विश्वास मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी व्यक्त केली होती.

 ■ पोहरादेवी येथे 105 फूट उंच नगाराच्या आकाराची वास्तू तयार होत आहे. येथे बंजारा समाजाच्या संस्कृती चे जतन करताना इतिहासाच्या वाटचालीचा बोलका आलेख असणार आहे. संत सेवालाल महाराज यांचा जन्म, मृत्यू कार्यबाबत माहिती ठळकपणे असणार आहे.

 ■ समाजसुधारकाचे जिवंत भासणारे पुतळे हे आकर्षण राहील. एकंदरीत बंजारा व्हिलेज साकारले जात आहे. ही वास्तू सौरऊर्जाचलीत राहणार आहे. शिवाय वातानुकूलनाचे नवे परिमान जोडले जाणार आहे. तसेच यात भाविकांसाठी पंधरा व्यक्तींसाठी एक अशा चार लिफ्टचे नियोजन आहे.

■ बंजारा समाजाची काशी पोहरादेवी ही उभ्या महाराष्ट्रात वास्तुशास्त्राचा आदर्श नमुना ठरेल. बंजारा समाजाची संस्कृती, इतिहासाचे जतन येथे होणार आहे. अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन संत सेवालाल महाराजांचे कार्य, विचार नव्या पिढीपर्यंत नेले जाणार आहेत.

■ आठ एकर जागेत साकारतोय काशी!

 1) बंजारा समाजाची काशी म्हणून सर्व दूर प्रसिद्ध असलेल्या पोहरा देवीचा विकास आठ एकर जागेत होत आहे. ही भव्य दिव्य वास्तू साकारताना अध्यात्मिक ऐतिहासिक आणि संस्कृतीची जोड दिली जात आहे.

 2) संग्रहालय माहिती अचूकपणे मिळावी यासाठी बंजारा, मराठी, हिंदी सह सात भाषांमध्ये या एअरोफोन असणार आहे. त्यामुळे भाविक भक्तासह पर्यटकांना या वस्तू नेमके काय आहे. हे सहजतेने कळू शकेल.!


हा ग्रांऊड रिपोर्ट जानुसिंग महाराज आणि प्रकाश महाराज यांना सोबत घेऊन तयार केलेला आहे.


 *चला तर मग या ऐतिहासिक सोहळ्याचे आपणही साक्षीदार होऊ या!


*एक दन समाजेसारू!       संकलन याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद

Post a Comment

0 Comments