-->

Ads

हत्यारे घेऊन जाणारी टोळी जेरबंद, धुळ्यात तब्बल 12 तलवारी जप्त, तर 10 जण जेरबंद

 

धुळे जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.



    धुळे, 24 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदूर येथून विविध हत्यारे घेऊन धुळ्याकडे जात असलेल्या एका टोळीला शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने अटक केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्ट जवळ मोठ्या शस्त्र साठ्यासह त्यांना ताब्यात घेतले. ही धारदार शस्त्रे राजस्थानमधून महाराष्ट्रात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड या सीमा तपासणी नाका येथून पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा गाडीमधून होणारी धारदार शस्त्रांची वाहतूक रोखली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 12 तलवारींसह, दोन गुप्ती, एक चॉपर, एक बटनाचा चाकू, दोन फायटर इतका मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. तसेच पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गाडीसह एकूण सुमारे 6 लाख 29 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



    अटक करण्यात आलेल्यांची नावे -

    सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण, विठ्ठल सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.


    पोलीस अधीक्षकांनी दिले 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस -

    पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस देखील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना आणि त्यांच्या पथकाला दिले आहे. दरम्यान, शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई जप्त केलेल्या तलवारी नेमक्या कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणल्या जात होत्या, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

    Post a Comment

    0 Comments