विशेष म्हणजे, उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास परफ्युम भेट दिला. हाच परफ्युम का हे सुद्धा सांगितलं.
सातारा, 29 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. जेव्हा उदयनराजेंनी पत्रकारांना काय भेट दिली तेव्हा अमित ठाकरे चांगलेच लाजले आणि एकच हश्शा पिकली.
अमित ठाकरे यांनी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट घेवून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली असुन यानंतर त्यांनी शिवतिर्थावर नतमस्तक होवून खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे.
अमित घरी आला तो माझा मुलगा घरी आल्यासारखा वाटला. अमित सारख्या तरुण नेत्यांनी पुढं आलं पाहिजे आणि लोकांची त्यांच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. अगदी प्रबोधकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या सगळ्यांचा त्यांनी नाव लौकीक केला पाहिजे, अमित ठाकरेंचा फॅन फॉलोईंग जोरात आहे, असं म्हणत अमित येणार आहे म्हटल्यावर मला केसांना क्लब केलं पाहिजे, असं मिश्कील उत्तर सुद्धा उदयनराजेंनी दिलं. तसंच अमित ठाकरे यांच्या हातून खूप मोठं काम व्हावं अशा शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास परफ्युम भेट दिला. हाच परफ्युम का हे सुद्धा सांगितलं. 'Bvlgari men हा परफ्युम खासदार उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना भेट दिला यावेळी 'तू लहान राहिला नाहीस मोठा माणूस झाला आहे आणि आमच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजेस म्हणून हा परफ्युम दिला आहे, असं उदयनराजे भोसले म्हणताच शेजारी अमित ठाकरेंना चक्क लाजले होते.
तर, साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असं होवू शकत नाही. ही भेट राजकीय नव्हती वैयक्तिक होती, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. राजे किती दिलखुलास आहेत याची आत गप्पा मारताना प्रचिती आली, असं वक्तव्य करताच एकच हश्शा पिकली.
0 Comments