19 वर्षीय पीडित तृतीयपंथी भिवंडीत राहत असून दोन्ही नराधमही त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होते.
ठाणे, 8 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यानंतर आता भिवंडीत तृतीयपंथीवर बंद खोलीत बेदम मारहाण करून सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघा नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर किन्नर अस्मिता संघटनेनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भिवंडी शहरातील आझाद नगर येथे एका खोलीत नेऊन बेदम मारहाण करत दोघा नराधमांनी 19 वर्षीय तृतीयपंथीयांवर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांवर अनैसर्गिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहाल सलीम खान (वय 23) आणि शाहिद (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्या नरधमांची नावे आहेत. तसेच या नराधमांना लवकरात लवकर जर अटक केली नाही तर किन्नर अस्मिता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय पीडित तृतीयपंथी भिवंडीत राहत असून दोन्ही नराधमही त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होते. त्यातच रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित तृतीयपंथी घरानजीक असलेल्या किराणा दुकानात दूध, अंडी पाव आणण्यासाठी गेला असता, त्याठिकाणी परिसरात राहणाऱ्या दोघा नराधमाने छेड काढून एका खोलीत बळजबरीने घेऊन गेले आणि दारू पिण्यासाठी पीडितला आग्रह केला.
मात्र, त्याने त्याला नकार दिला. त्यानंतर नराधमाने तुझ्याकडे आमचे काम आहे. तुझ्याशी काही बोलायचे आहे. असे बोलून पीडितला नराधम शहीद याने त्याच्या खोलीचा आतून दरवाजा बंद करून पुन्हा पीडितला दारू पिण्यास आग्रह केला. मात्र, पीडितने नकार देताच दोन्ही नराधमांनी बेदम मारहाण केली आणि पीडित तृतीय पंथीवर बळजबरीने अळीपाळीने अनसैर्गिक अत्याचार केला आहे. अनसैर्गिक अत्याचार केल्यानंतर पहाटे चार वाजल्याच्या सुमारास पीडितला खोली बाहेर काढले. आणि घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकीही नराधमांनी दिली. त्यानंतर पीडिताला बेदम मारहाण आणि अनसैर्गिक अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने पीडितने घडलेला प्रसंग घरच्यांना आणि गुरुला सांगितला.
त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पीडितने पोलिसांसमोर घडलेल्या प्रकार सांगितला. यानंतर दोन्ही नराधमांविरोधात, आज पहाटेच्या सुमारास भादंवि कलम 377, 324, 342, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरु केला आहे. किन्नर अस्मिता या संघटनेच्या वतीने न्याय मिळाला नाही तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक झाली नाही, तर किन्नर संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments