-->

Ads

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या ९७ व्या जयंती निमित्त ग्रँटरोडयेथील लालबत्ती एरियामध्ये नुकतंच स्नेहल कांबळे ह्यांनी 'एक ग्लास दुधाचा ताईसाठी' ह्या उपक्रमाअंतर्गत देहविक्रेय करणाऱ्या महिलांना दूध व फळं ह्यांचं वाटप करण्यात आलं.

 स्नेहल कांबळे ह्यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिंदे गटात खासदार श्रीकांत शिंदे व युवासेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गेली अनेक वर्षे समाजकार्य व काही वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केल्यावर पक्षाच्या कार्यपद्धती व जातीयवादामुळे नाराज होऊन स्नेहल कांबळे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्याचे बोललं जातं.                                    हा उपक्रम राबवून स्नेहल कांबळे शिंदे गटात स्थिरावण्याच्या प्रयत्न करत आहेत. पण हिंदू विचारांच्या शिंदे गटात बहुजन समाजातून आलेल्या स्नेहल कांबळे ह्यांना काय जबाबदारी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.                             जसं त्या अनेक वर्षे लोकांसाठी महाराष्ट्रभर काम करत आहेत तसेच त्या ह्या पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करत राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments