काय आहे नेमकं प्रकरण?
बीज माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे यांचे भाषण भारतीय विज्ञान काँग्रेसच्या, शेतकरी विज्ञान काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की 'पद्मश्री पुरस्कार स्विकारायला गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळने गावात अद्याप विकास पोहोचला नसल्याचे आपण सांगितले. गावात पोहोचण्यासाठी धड रस्ता नाही, पिण्याचे पाण्यासाठी महिलांना तीन किलोमीटर पायी जावे लागते' असं आपण मोदी यांना म्हटल असं पोपरे म्हणाल्या.
माईक बंद केल्याचा आरोप
त्या पुढे बोलताना म्हणाल्या तत्कालीन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माझ्या गावात येण्याची तयारी दाखवली होती. मी त्यांना त्यावेळी म्हटलं तुम्हाला हेलिकाॅप्टर घेऊन गावात यावे लागेल. कारण गावात रस्ताच नाही. पाटील यांच्या भेटीनंतरही गावात कुठलाही फरक पडला नाही. बीज माता म्हणून जरी प्रसिद्धी मिळाली असली तरी माझ्या गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नसल्याची खंत यावेळी राहीबाई पोपरे यांनी भाषणातून व्यक्त केली. दरम्यान पोपरे यांचं भाषण सुरू असतानाच त्यांच्या समोरील माईक बंद करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
0 Comments