महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
महागाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी येथे. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आपले सर्वांचे अस्तित्व आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी शिक्षणाची महती ओळखून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केलीत. त्यामुळेच आज शिक्षण घेऊन असंख्य महिला विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. जोपर्यंत त्यांचे विचार आपण अंगिकारत नाही, तोपर्यंत समाजाला व देशाला योग्य दिशा मिळणार नाही असे प्रतिपादन डॉ विठ्ठल सल्लावार यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी डॉ सल्लावार होते. समुदाय आरोग्य आधीकारी डॉ शबिर शेख ओषद निर्माण अधिकारी सोदागर GNM जुही बागडे, रूपाली चोपडे, ANM नदां भगत, निलेश कळमकर आरीफ शेख कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. डॉ सल्लावार म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्व समाजातील नागरिकांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. सावित्रीबाई यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पती महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत त्या महिलांच्या उन्नतीसाठी झटल्या व पुरुष प्रधान संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विपरीत परिस्थितीत कडवट विचारसरणीशी झुंज देत आपले ध्येय साध्य केले असे त्यांनी सांगितले.
यावेळी GNM जुही बागडे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या काळात महिलांना अनेक प्रतिबंध होते, महिला मुक्तपणे कुठलीच गोष्ट करू शकत नव्हत्या. अश्या कठीण परिस्थितीत महिलांना योग्यप्रकारे जीवन जगता यावे यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. सावित्रीबाईंनी आधी स्वतः शिक्षण घेतले आणि मग महिला शिक्षणासाठी प्रयत्न केलेत. अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली असे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपले विचार व्यक्त करीत त्यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा करीत, त्यांच्या कार्याचा गौरव केला.
0 Comments