-->

Ads

झारखंडमधील जैन धर्माचे पवित्र स्थान सम्मेद शिखरजीला दिलेला पर्यटन स्थळ दर्जा रद्द करा - माजी आमदार नरेंद्र पवार


भूमीची पवित्रता धोक्यात येत असल्यामुळे रद्द करण्याची मागणी 


कल्याण, दि. ४ (प्रतिनिधी): झारखंड राज्य सरकारने जैन धर्माचे 20 तिर्थकर ज्या भूमीत मोक्ष गेले ते पवित्र ठिकाण श्री सम्मेद शिखरजींचे पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे. सम्मेद शिखरजीला दिलेला पर्यटन स्थळांचा दर्जा रद्द करण्यात यावा अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.



पवार म्हणाले, सम्मेद शिखरजी हा केवळ एक जमिनीचा तुकडा नाही तर ते एक शाश्वत तिर्थ आहे. त्या ठिकाणच्या कणाकणात पवित्रता आहे, त्या ठिकाणच्या भूमीचे पर्यटन स्थळात रूपांतर करणे म्हणजे तिची पवित्रता नष्ट करण्यासारखं आहे.सम्मेद शिखरजींचे पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे 

याचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments