-->

Ads

फोटो व्हायरल करण्याची धमकी, लॉजवर नेऊन अल्पयवीन मुलीवर अत्याचार; तरुणाला सुनावली कोठडी

 अल्पवयीन मुलगी नातेवाईकाच्या घरात असताना सुजित गाडे या तरुणाने तिचे फोटो काढले होते.


    सोलापूर, 18 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, बलात्काराच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    अल्पवयीन मुलगी नातेवाईकाच्या घरात असताना सुजित गाडे या तरुणाने तिचे फोटो काढले होते. त्यानंतर फोटो मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली होती. ती तरुणी लातूर येथे असताना तिला भेटून त्याने तिला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पुढे तुळजापूर येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

    हा प्रकार त्याने ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान केला, अशा आशयाची फिर्याद पीडित मुलीने पोलिसात दाखल केली आहे. यानुसार टेंभुर्णी पोलिसांनी सुजित गाडे याच्याविरुद्ध पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच त्याला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जोग करीत आहेत.


    माढा तालुका परिसरात नातेवाईकाच्या घरात असताना अल्पवयीन तरुणीचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले होते. याप्रकरणी सुजित शिवाजी गाडे (वय-24 रा. सातोली, ता.करमाळा) याला टेंभुर्णीच्या पोलिसांनी अटक केली. त्याला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने मंगळवारी दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Post a Comment

    0 Comments