भिम टायगर सेना यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम संपन्न
पुसद प्रतिनिधी
पुसद -भिमा कोरेगाव शौर्यदिनी शुरवीरांना बुध्द भीम गीताद्वारे मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भिम टायगर सेना शाखा पुसदच्या व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली होते.
१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ , रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य २८००० सैन्यांचा पराभव केला होता.
विजयी ध्वज रोवला होता. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी भिम टायगर सेना शाखा पुसदच्या वतीने शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते . या शुरविराना बुध्द भिम गितातुन मानवंदना देवुन अभिवादन करण्यात आले.
दि. 1 जानेवारी 2023 रोजी पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ सुजाता महिला मंडळ व यशोधरा महिला मंडळ यांच्या हस्ते पंचशील त्रिशरण घेण्यात आले.
त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम सुषमा देवी धम्मदीक्षा वाहुळे लातुरकर, विकासराजा गायकवाड नांदेङ यांचा शांती आणि क्रांतीवर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक ङाँ.प्रशांत वासनिक यांनी केले .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपअध्यक्ष ययातीभाऊ नाईक सुधीर भाऊ देशमुख विनोददादा फुल माळी पंजाबदादा कांबळे भोलेनाथ कांबळे देवेंद्र खडसे लक्ष्मण कांबळे दिनेश खांडेकर समाधान केवटे नारायण ठोके. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक महेश हंबर्डे प्रा. डॉ सुनील खाडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू सरकटे प्रभाकर खंदारे राजकुमार पठाङे. गीताताई कांबळे राजू पठाडे अण्णा दोडके गौतम खडसे दीपक गायकवाड राहुल धुळधुळे व भिम टायगर सेना भिम टायगर सेना महिला आघाडी, भिम टायगर सेना ऑटो अंबुलन्स,यांनी परिश्रम घेतले.
व मोठ्या प्रमाणात जनसागर कार्यक्रमाला उपस्थित होता व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन गजभिये अंबादास वानखेडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन किशोर दादा कांबळे यांनी केले.
0 Comments