-->

Ads

गर्लफ्रेंड फोनवर नेहमी राहायची बिझी, संतापात बॉयफ्रेंडने केलं भयानक कांड

 गर्लफ्रेंड अनेकदा मोबाईलवर व्यस्त असायची.



भदोही, 20 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या आणि बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्लफ्रेंड अनेकदा मोबाईलवर व्यस्त असायची. त्यामुळे संतप्त प्रियकराने भयानक कट रचत तिच्या हत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -


यूपीच्या भदोहीमध्ये एका तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी भयानक खुलासा करताना दोन तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी एक हा मृताचा प्रियकर आहे. त्याने प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. प्रेयसी फोनवर दुसऱ्याशी बोलत असल्याचा संशय प्रियकराला होता. याच कारणावरून त्याने प्रेयसीची हत्या केली होती.

बुधवारी रात्री उशिरा अरविंद नावाच्या तरुणाने त्याच्या प्रेयसीला त्याच्या घराजवळील शेतात भेटण्यासाठी बोलावले, जिथे आरोपी त्याच्या भावासह उपस्थित होता. तरुणी पोहोचताच प्रियकराने तिच्यावर पिस्तुलाने गोळी झाडून तिची हत्या केली. असे सांगितले जात आहे की, प्रेयसी जेव्हा आरोपी तरुणाला भेटायला गेला तेव्हा तिच्यासोबत नातेवाईकाची मुलगीही होती. तिने घरी जाऊन लोकांना हत्येची माहिती दिली.


हत्येसाठी मिर्झापूर येथून आणले पिस्तूल -

हत्येनंतर पोलिसांची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांना समजले की, मृत ही जवळच्याच गावातील मुलाशी बराच वेळ बोलत असे. मृताचा प्रियकर असलेल्या अरविंद नावाच्या आरोपीनेच हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तर भदोहीचे पोलीस अधीक्षक डॉ.अनिल कुमार यांनी सांगितले की, मृत हा आरोपीच्या अनेक दिवसांपासून संपर्कात होता. आरोपींनी 20 दिवसांपूर्वी मिर्झापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून पिस्तूल खरेदी केले होते. काल रात्री हत्या करून आरोपी फरार झाला. 12 तासांच्या आत आरोपी आणि त्याच्या भावाला हत्येत वापरलेल्या पिस्तुलासह अटक करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments