-->

Ads

चेन्नई येथे झालेल्या सिप अबॅकस स्पर्धेत मिळविले यश.

 पुसदची तृप्ती प्रदीप बेंद्रे भारतातून दुसरी.




पुसद प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर मेटकर


पुसद येथील छत्रपती शिवाजी वार्ड मधील रहिवासी तृप्ती प्रदीप बेंद्रे या बारा वर्षीय विद्यार्थिनीने चेन्नई येथे सिप अबॅकस अकॅडमी द्वारे आयोजित नाइंथ नॅशनल सिप अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये भारतातून दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे. तृप्ती ही बचपन इंग्लिश मीडियम स्कूल ची  विद्यार्थिनी आहे. भारतातून दुसरा येण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल तृप्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


एका गरीब घरातील होतकरू मुलीने भारतातून दुसरा येण्याचा बहुमान मिळविल्याबद्दल तृप्तीचे छत्रपती शिवाजी वार्ड येथील नागरिकांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. या सत्कार समारंभ प्रसंगी राजू वाकडे (माजी उपजिल्हाप्रमुख) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, दीपक परीहार, विजय बाबर, पत्रकार संदेश कान्हु, दीपक महाडिक, माधव कांबळे, विनोद गाडे, माधवराव हराळ, शैलेश थोरात, शेख जावेद, गणेश निकम, अविनाश आरकड, माणिक भालेराव, अरुणराव डोंगरे, विष्णू रणमले, गणेश निकम राजू आरकड, निवृत्ती थोरात, सुनीता वाकडे, बेबी जाधव, पंचफुला डोंगरे, अनुसया थोरात, सुवर्णा थोरात, पर्यागबाई थोरात, गयाबाई खंदारे, शिला माने, लक्ष्मी माने, सरला नावडे, आधी नागरिक उपस्थित होते. 


तृप्ती आपल्या यशाचे श्रेय आजी वंदना तोंडारे, आई दिपाली, वडील प्रदीप व सिप अबॅकस अकॅडमी चे शिक्षक धनंजय देशमुख यांना देते. तृप्तीच्या या यशाबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments