पेणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये कंडक्टरने महिलेचा विनयभंग केला आहे.
नवी मुंबई, 20 जानेवारी : पेणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये कंडक्टरने महिलेचा विनयभंग केला आहे. पनवेल-रोहा बसमधील ही घटना आहे. रात्रीच्यावेळी कंडक्टरने एका महिलेचा विनयभंग केला तसेच तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. या घटनेनं खळबळ उडाली आहे. एस.बी.शिंदे असं आरोपीचं नाव असून, या प्रकरणात आरोपीविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बसमध्ये विनयभंग
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल -रोहा बसमध्ये कंडक्टरने महिलेचा विनयभंग केला आहे. पीडित महिला ही या बसमधून पनवेल- पेण असा प्रवास करत होती. रात्रीच्यावेळी संधी साधून या वाहकाने महिलेच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. महिलेने वाहकाला हटकले असता त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर बस पेणजवळ आली असताना पुन्हा एकदा आरोपीने महिलेला गुप्तांग दाखवून अश्लील चाळे केले. या प्रकरणात आरोपी वाहक एस.बी. शिंदे याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
0 Comments