-->

Ads

मस्करीत दुचाकीला बांधलं मग अचानक गाडी सुरू केली अन्..; पतीचं गर्भवती पत्नीसोबत राक्षसी कृत्य

सुमनने सांगितलं, की पतीने हसत हसत माझे हात बाईकला बांधले. मला वाटलं की तो मस्करी करत आहे. मात्र, नंतर अचानक त्याने गाडी सुरू केली आणि मग..



    लखनऊ 15 जानेवारी : पती-पत्नीचं नातं अतिशय खास असतं, असं म्हटलं जातं. हे दोघंही एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कधीकधी हे नातं अतिशय भयानक रूप धारण करतं आणि मग याचा शेवटही हादरवणारा असतो. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधून समोर आली आहे. ज्यात पतीने आपल्या पत्नीसोबत अतिशय धक्कादायक कृत्य केलं.

    दारूड्या पतीने आपल्या ८ महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीला दुचाकीला बांधून गल्ली-गल्लीतून फरफटत नेलं. यामुळे गर्भवती महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

    हे संपूर्ण प्रकरण घुंगचाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंगचाई गावातील आहे, जिथे एका मद्यधुंद पतीने आपल्या गर्भवती पत्नीला दुचाकीला बांधून ओढलं. ज्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घुंगचाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंगचाई गावातील रहिवासी वेशपाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची बहीण सुमन याच गावात पती रामगोपालसोबत काही अंतरावर राहते. शनिवारी दोघांचं काहीतरी कारणावरुन भांडण झालं. यानंतर रागात रामगोपालने सुमनला मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नात गाडीला बांधून फरफटत नेलं.

    भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पती राम गोपाल याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की आरोपीला अटक करण्यात आली आहे. पतीविरुद्ध 307 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पती दारूच्या नशेत होता आणि त्याने त्याचं कृत्य स्वीकारलं आहे. सध्या पीडिता स्वतः या संपूर्ण प्रकाराबद्दल सांगत आहे. सुमनने सांगितलं, की पतीने हसत हसत माझे हात बाईकला बांधले. मला वाटलं की तो मस्करी करत आहे. मात्र, नंतर अचानक त्याने गाडी सुरू केली आणि मग गल्लीतून फरफटत नेलं. मला दुखापत झाली असून वेदनाही होत आहेत

    Post a Comment

    0 Comments