-->

Ads

पूसद - नीटची तयारी करणाऱ्या तरुणाने घरामध्ये घेतला गळफास


एकुलत्या एक लेकाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ


प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या नवीन पुसदमध्ये राहत्या घरी दि.३ जानेवारी २०२३ रोजीच्या दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान नीटची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकुलता एक लेकाने राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.अभ्यासाचा ताण सहन न करू शकल्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


आनंद माणिकराव पुंडे वय १७ वर्षे रा.नवीन पुसद असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.तो कोष्टवार दौलत खान विद्यालयाचा विद्यार्थी होता.त्याने दहावीची परीक्षा नुकतीच पास केली होती.तो नांदेड येथे अकरावी मध्ये शिकत होता. त्या सोबतच तो नीटची तयारी देखील करत होता. ऑनलाईन क्लासेस असल्याने तो नवीन पुसद येथील राहत्या घरी राहून क्लासेस मधून शिक्षण घेत होता. स्वभावाने शांत असलेल्या अभ्यासू तरुणाने अचानक आत्महत्या का केली याचे नेमके कारण कोणालाही कळू शकले नाही.त्याची बहीण औरंगाबाद येथे एमडीचा अभ्यास करीत आहे.तो त्याच्या राहत्या घरी दररोज दुसऱ्या माळ्यावर खोलीमध्ये जाऊन नेहमी अभ्यास करत होता.अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments