-->

Ads

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत नसणाऱ्या अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा - माजी आमदार नरेंद्र पवार

 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत नसणाऱ्या अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा - माजी आमदार नरेंद्र पवार


                                                           



  महाराष्ट्र हा

जाज्वल्य इतिहास असलेल्या राजेंचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांचा इतिहास माहिती असायला हवा. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर त्यावर आक्षेप घेत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ज्यांना छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहीत नाही त्या अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा अशी मागणी केली.


40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केले, मरणयातना भोगल्या मात्र हिंदू धर्म सोडला नाही, हिंदुत्वाचा पुरस्कार केला ते खरे धर्मवीरच होते असे मत माजी आमदार, भाजपा नेते नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर सर्वत्र टीका होत असतानाच नरेंद्र पवार यांनी ही मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Post a Comment

0 Comments