ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. या दरम्यान युवकाने महिलेला लग्नाचे आमिष दिले. यानंतर दोघेजण एकाच रूममध्ये राहू लागले.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
बीडच्या माजलगांव शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत असलेल्या एका नर्स महिलेला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 वर्षीय एक विवाहित महिला नर्स म्हणून कार्यरत होती. तिच्यासोबत या रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या दादासाहेब तौर (वय-23 वर्षे) याची आणि पीडित महिलेची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. या दरम्यान युवकाने महिलेला लग्नाचे आमिष दिले. यानंतर दोघेजण एकाच रूममध्ये राहू लागले. या कालावधीत त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला.
पीडित महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती. मात्र, आरोपी दादासाहेब हा लग्नास टाळाटाळ करू लागला. यामुळे पीडित महिलेने माजलगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी दादासाहेब तौर याच्याविरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments