-->

Ads

पोहरागड येथे राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार 2023 सोहळा संपन्न

यवतमाळ प्रतिनिधी:-  संजय जाधव

पोहरागड- 11/1/2023 - संपूर्ण भारतात  साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 21  सामाजिक कार्यकर्त्यांना आणि लेखकांना  राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले. पोहरागड येथे धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज समाज विकास फेडरेशन भारत राष्ट्रीय कार्यालय बसवकल्याण जिल्हा बिदर (कर्नाटक राज्य) या फेडरेशनच्या द्वितीय वर्षा निमित्ताने आयोजित. कार्यक्रमात भारतातील 21 लोकांना साहित्यिक आणि सामाजिक योगदानाबद्दल धर्मगुरु तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत शेखर महाराज पोहरागड प्रमुख अतिथी म्हणून महंत बापू महाराज हैदराबाद, मंहत संजय महाराज पोहरागड, कैलास महाराज हेगडी, प्रसिद्ध पत्रकार शंकर आडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खालील लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये

 1)याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद2) बाबू होना नायक बसवकल्याण जिल्हा बिदर 3)  पंकज पाल महाराज राष्ट्रीय युवा प्रबोधनकार रुही गुस्ता,4) श्रीमती सिम्पलताई राजकुमार राठोड पुसद,5)डॉ. रामचंद्र तुळशीराम राठोड, पुसद, 6)  श्री विठ्ठल चव्हाण मेहकर ,7) अशोक गणेश राठोड चाळीसगाव 8) विलास देवसिंग रामावत राष्ट्रीय संयोजक गोरसिकवाडी भारत बुलढाणा ,9)  श्रावण राठोड मध्य प्रदेश ,10) रवींद्र नाईक तेलंगणा,11) युवराज रोहिदास जाधव पुसद ,12) मानसिंह ओमकार बंजारा राजस्थान,13) अरुण वाघाजी पवार मध्य प्रदेश,14) खिरसागर नायक उडीसा ,15) सुदाम रामराव राठोड चंद्रपूर ,16)सुभाष विठ्ठल राठोड कर्नाटक ,17) संजय दरकास राठोड महागाव,18) संतोष कानू चव्हाण दिग्रस,19) अविनाश राठोड दिग्रस,20)  दिनेश बंडू जाधव पुसद,

21) अंबादास शिवाजी राठोड गंगाखेड  

यांच्या सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सौ. अर्चना विजय राठोड व्यवस्थापकीय संचालक आणि विजय राठोड सामाजिक कार्यकर्ता आणि श्री अभिषेक झरनाथ राठोड कार्यकारी संचालक आणि त्यांच्या टीमने उत्कृष्टपणे आयोजन केले होते. या संस्थेने ज्यांचे मातृ-पितृ छात्र हरपलेले आहे अशा दहा मुलांना सुद्धा दत्तक घेतलेले असून ही संस्था मागील दहा वर्षापासून गोरबंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. संपूर्ण भारतामध्ये विजय राठोड हा सामाजिक कार्यकर्ता गोरबंजारा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांनी या 21 लोकांना राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने समान सन्मानित केले असून त्यामध्ये प्रशस्तीपत्र, आकर्षक शिल्ल्ड, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांनी यथोचित सन्मान केलेला आहे. एवढेच करून ते थांबले नाहीत .तर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अनेक भजनी मंडळीला बोलावून त्यांना सुद्धा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. एकंदरीत धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत यांचे कार्य कौतुकास्पद असून निश्चितच नोंद घेण्यासारखे आहे. सदर कार्यक्रमांचे उत्कृष्ट संचालन याडीकार पंजाबराव चव्हाण यांनी केले असून प्रास्ताविक या संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक विजय राठोड यांनी केले आणि या सत्कार सोहळ्याप्रसंगी श्रीमती सिम्पलताई राठोड, श्री पंकजपाल महाराज, श्री संतोष चव्हाण, श्री सुभाष राठोड, बाबू होना नायक, श्री विलास रामावत, श्रावण राठोड, नंदलाल राठोड, डॉ. रामचंद्र राठोड, याडीकार पंजाबराव चव्हाण, अरुण पवार ,अशोक राठोड यांची भाषणे झाली. अध्यक्ष भाषण आणि मार्गदर्शन महंत शेखर महाराज यांनी केले व आभार प्रदर्शन अभिषेक राठोड यांनी केले त्यानंतर सर्वांना भोजन देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अत्यंत उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता विजय राठोड हुडीकर हल्ली मुक्काम बसवकल्याण जिल्हा बिदर कर्नाटक राज्य यांचे सर्व कौतुक करत आहे. भारतातून जवळपास 800 ते 900 लोकांची भरगच्च उपस्थिती होती अनेक टीव्ही चॅनेल चे पत्रकार उपस्थित होते

Post a Comment

0 Comments