शिक्षिका आणि विद्यार्थ्याची अजब प्रेमकहाणी समोर आली आहे. यूपीच्या नोएडामध्ये एक शिक्षिका प्रेमात इतकी वेडी झाली की ती तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेली.
लखनऊ 18 जानेवारी : शिक्षिका आणि विद्यार्थ्याची अजब प्रेमकहाणी समोर आली आहे. यूपीच्या नोएडामध्ये एक शिक्षिका प्रेमात इतकी वेडी झाली की ती तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेली. आता विद्यार्थ्याच्या वडिलांनी सेक्टर 113 पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 123 मधील 22 वर्षीय शिक्षिका घरी मुलांच्या ट्यूशन घेते. शिक्षिकेच्या घरासमोर 16 वर्षांचा एक मुलगा राहतो. असं सांगितलं जात आहे की, अल्पवयीन मुलगा ट्यूशनसाठी शिक्षिकेकडे जात असे. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघंही एकमेकांना पसंत करू लागले. रविवारी दोघेही घरातून पळून गेल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याचे वडील मूळचे देवरियाचे आहेत.
मुलाच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, त्यांचा 16 वर्षीय मुलगा रविवारी दीडच्या सुमारास मावशीच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला, मात्र रात्रीपर्यंत तो परतला नाही. समोर राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने आपल्याला मुलाला फूस लावल्याचं अल्पवयीन विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
या प्रकरणाबाबत अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितलं की, 'तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मिळाली आहे की, मुलगा या तरुणीकडे शिकायला जात असे. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचंही समोर आलं आहे. लवकरच दोघांचाही शोध घेतला जाईल.'
0 Comments